इंग्रजांचा भारतात प्रवेश


भारतात ३१ डिसेंबर,१६०० साली इंग्रज आले ते व्यापार निम्मित. आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना केली. पण या आधी हि जॉन मोल्डेनहाल हा प्रवाशी आला होता. आणि त्यांनी व्यापार करता करता आपल्या वर राज्य गाजवायला सुरवात केली. याला कारणीभूत आपल्याकडील परिस्थिती होती. संस्थानातील भांडणे, जातभेद, घराणेशाही, यामुळे आपल्यावर राज्य करणे त्यांना सोपे गेले.
३१ डिसेंबर, १६०० ला इंग्रज राणी एलिझाबेथ चा १५ वर्षाचा जाहीरनामा घेऊन भारत आले आणि ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. भारतात त्यांना फ्रेंच आणि डच सत्तेचा सामना करावा लागला. यातून इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्ध झाली. पहिले युद्ध १७४५ ला झालेले युद्ध ब्याटल ऑफ सन्त थोम्ब मानून ओळखले जाते यात फ्रेंचांचा विजय झाला. १७४८ ला ब्याटल ऑफ अंबूर झाले यातही फ्रेंचांचा विजय झाला परंतु १७६० मध्ये झालेल्या ब्याटल ऑफ वंदी वॉश मध्ये मात्र इंग्रजांचा विजय झाला. आणि चंदनगर,माहे,मद्रास, पौंडेचरी या चार वसाहती फ्रेंचांना देण्यात आल्या. तसेच १७७२ ला डचांशी झालेल्या युद्धात इंग्रज जिकंले आणि डच कायमचे भारत सोडून निघून गेले.
इंग्रजांनी आपली पहिली वसाहत मसुलीपट्टणम येथे सुरु केली. तसेच १६६८ ला पोर्तुगीजांकडून त्यांना मुंबई हि वसाहत हुंड्यात मिळाली.  इंग्लड चा राजा चाल्स द्वितीय चा वीवाह पोतुगाल तिया राजकुमारी शा झाला होता. १६०८ मध्ये विल्यम हाफकिंग्स हा अधिकारी परवाना कायम करण्यासाठी जहांगीरच्या दरबारी गेला परंतु त्याला यश आले नाही आणि १६११ ला झालेल्या मुघल आणि इंग्रज युद्धात इंग्रजांचा पराभव झाला पण १६१३ मध्ये झालेल्या ब्याटल ऑफ सुरत मध्ये इंग्रज जिंकले आणि सुरत हि वसाहत लीगल केली गेली. १६१५ ला राणीचा जाहीरनामा कायमस्वरूपी करण्यात आला.
२३ जुन, १७५७ ला सिराजउद्दोला आणि इंग्रज यामध्ये प्लासीची लढाई झाली. या युद्धात सिराजउद्दोलाचा पराभव झाला आणि इंग्रजी सत्तेचा पाय रचला गेला. त्यानंतर इंगर्जांनी मीर जाफर ला बंगालच्या गादीवर बसवुन बंगाल मधून  फ्रेंचांची हकालपट्टी केली. त्यानंतर १७६४ ला झालेल्या बक्सर च्या युध्यामुळे तर इंग्रजी सत्तेची पकड भारतीयांवर झाली. बंगाल, बिहार, उडीसा हे प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात  आले. त्याच वेळी बंगालमध्ये राबर्ट क्लाईव्ह नामक गव्हर्नर ने दुहेरी शासन प्रणाली अस्तित्वात आणली आणि बंगाली जनतेचा छळ सुरु झाला. कंपनी आपला व्यवहार बोर्ड ऑफ डायरेक्टर मार्फत चालवत असे. हि २४ सदस्य असलेली टीम कंपनी शेयर होल्डर मार्फत  जात असे. परंतु नंतर कंपनी बंगाल मधील जनतेचा करीत असलेला छळ, कंपनी व्यवहारात माजलेला भ्रष्ठाचार, यांच्या बातम्या इंग्लंड पार्लमेंट कडे गेल्या. तसेच भारतातील संपूर्ण व्यापाराचा मक्ता कंपनी कडे दिल्यामुळे इगलण्डमधील व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटू लागला. आणि व्यापारी कंपनी ला राज्य करण्या विरुद्ध गेले. त्याच दरम्यान कंपनी ने इंग्लंड पार्लमेंट कडे मोट्या रकमेच्या कर्जाची मागणी केली. त्यामुळे  कारभारावर टीका होऊन रेतीउलटींग ऍक्ट तयार करण्याची शिफारास झाली. हे ब्रिटिश सरकारने कंपनी विरुद्ध उचलेले पहिले पाऊल होते. याआधी हि पार्लमेंट ने  १७६७  साली ४०००० पौंड मधील १० टक्के पार्लमेंट ला द्यावे अशी मागणी केली होती.आणि यातुनच 1773 चा कायद्याचा पाया पतला गेला  आणि भारतीय राजकारणात इंग्रजांचा प्रवेश झाला.
(1712चा कायदे क्रमशः)